आयकर परताव्यास मुदतवाढ

income-tax
नवी दिल्ली – केंद्र सरकारने सर्व करदात्यांसाठी बँकांच्या एक दिवसाच्या संपामुळे आयकर परतावा भरण्याची मुदत ३१ जुलैवरून वाढवून ५ ऑगस्ट केली आहे.

केंद्रीय महसूल सचिव हसमुख अधिया यांनी याविषयी ट्विट केले असून त्यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे, की आजच्या बँकांच्या संपामुळे आणि जम्मू-काश्‍मीरमधील अशांत परिस्थितीमुळे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी देशभरात आयकर परतावा भरण्याची मुदत ३१ जुलै होती. ही मुदत आता ५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. तेथील परिस्थितीमुळे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास या राज्यात अंतिम मुदत ३१ ऑगस्ट असणार आहे.

Leave a Comment