मुंबई : भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलमध्ये मेगा भरती करण्यात येणार असून ज्युनियर इंजीनियरच्या पदावर तब्बल २७०० जागा बीएसएनएलमध्ये भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत १० जुलै ते १० ऑगस्टपर्यंत असून या पदासाठी अर्ज कऱणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षे या दरम्यान असावे. एससी/एसटी आणि बीएसएनएल कर्मचाऱ्यांसाठी वयामध्ये ५ वर्षांपर्यंत सूट देण्यात आली आहे. २५ सप्टेंबर रोजी ऑनलाईन चाचणीतून पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
बीएसएनएलमध्ये मेगा भरती
उमेदवाराने टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक/रेडिओ/कॉम्प्युटर/आयटी/इन्स्ट्रुमेंटेशन यापैकी एक अभ्यासक्रम तीन वर्षांचा इंजिनिअरिंग डिप्लोमा/बी.टेक/बीई, केंद्र अथवा राज्य सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत पूर्ण केलेला असावा.
या व्यतिरिक्त अधिक माहितीसाठी http://www.externalbsnlexam.com/ या लिंकवर क्लिक करा.
i am rupali phale .b.com one sub -eco fail other all sub passing . i am working till devlpoers office account asdsistant age -30 ,