कर्करोगावर योगोपचार प्रभावी

cancer
नवी दिल्ली: अनेक प्रकारच्या कर्करोगांवर योगोपचार प्रभावी ठरत असल्याचा निष्कर्ष ‘आयुष’ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या ‘सेन्ट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नॅचरोपॅथी’ या संस्थेने काढला आहे. त्यानुसार कर्करोगावर योगोपचार करण्याचे पाच प्रकल्प ‘आयुष’ हाती घेणार आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोग हा समाजासमोर मोठ्या आव्हानाच्या स्वरुपात उभा राहिला आहे. कर्करोगाचे उपचार अत्यंत खर्चिक असल्यामुळे कर्करोगाला बळी पडलेल्या रुग्णाच्या कुटुंबाचे अर्थकारण ढासळून जाते. मात्र आधुनिक वैद्यकशास्त्राला योगोपचार आणि निसर्गोपचार यांची जोड दिल्यास कर्करोगापासून मुक्ती मिळविणे अधिक सुलभ होत असल्याचे निष्कर्ष ‘सेन्ट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नॅचरोपॅथी’च्या वतीने हाती घेण्यात आलेल्या दोन संशोधन प्रकल्पांमध्ये निदर्शनास आल्याचा दावा संस्थेने केला आहे.

या संशोधनाची व्याप्ती वाढवून त्याला अधिक विकसित करण्यासाठी संशोधन प्रकल्पांची संख्या वाढवून ५ पर्यंत नेण्याचा प्रस्ताव संस्थेने ‘आयुष’ मंत्रालयाला दिला आहे. या प्रस्तावाबाबत मंत्रालय अनुकूल असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment