महिलांनी या गावात बनवली मद्यप्राशनाची संस्कृती

beer
नवी दिल्ली – सध्या एक वेगळेच चित्र मध्यप्रदेशच्या आदिवासा बहुल जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बीअरला येथील लोकांमध्ये प्रचंड पसंती मिळत असून या आदिवासींना झाडावर तयार जालेल्या ताडी आणि देशी दारूच्या ऐवजी आता बीअरचे व्यसन जडले आहे. त्याचबरोबर येथील आदिवासी महिलादेखील खुलेआम थेट बाटलीने बीअर पीत असल्याचे चित्र येथे अनेकदा दिसते.
beer1
आदिवासींमध्ये ताडी ( एका झाडाच्या रसापासून तयार केलेली देशी दारु) प्यायली जाते. दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी ताडी किंवा मव्हाची दारु प्यायची आणि नृत्य करायचे हे आदिवासींमध्ये नेहमीच घडत असते. आदिवासी समाजात महिलाही पुरुषांबरोबर ताडी पितात. त्यात काहीही गैर समजले जात नाही. जस जसे आदिवासी लोक शहरांच्या संपर्कात आले तस तशी या भागात देशी दारुही विकली जाऊ लागली.
beer2
दार, झाबुआ आणि अलीराजपूरचे आदिवासी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून देशी दारुऐवजी बीयर प्यायला लागले आहेत. त्यांना बीअरचे एवढे व्यसन जडले आहे की, अलीराजपूरमध्ये बीअरची विक्री इंदूरपेक्षा जास्त होत आहे. येथे दारुच्या दुकानावर महिलांची गर्दीही नेहमी पाहायला मिळते. अनेकदा तर आदिवासी महिला थेट बाटली किंवा हाताने बीअर पित असल्याचे पाहायला मिळते. बीअरसाठी याठिकाणी खुनासारखे गुन्हेही घडत आहेत. अलीराजपूरच्या सोरवा गावात गेल्या काही दिवसांत एका आदिवासीने त्च्या मित्राला मारल्याचे समोर आले. त्या मित्राने बीअरपार्टीला बोलावले नाही, हे त्यामागचे कारण होते.

Leave a Comment