ब्लॅकबेरीचा डीटीईके ५० स्मार्टफोन सादर

blackberry
ब्लॅकबेरीने सर्वात सुरक्षित असल्याचा दावा करणारा डीटीईके ५० अँड्राईड स्मार्टफोन बाजारात आणला आहे. यात युजरचा व्यवसाय, त्याची वैयक्तीक माहितीसह सारा डेटा इनक्रिप्ट बॅकअप वाईप व रिस्टोअर सपोर्टसह सुरक्षित राहणार असल्याचा कंपनीचा दावा आहे. शिवाय या फोनला एक मालवेअर प्रोटेक्शनही दिले गेले आहे अ्रसे कंपनीचे अधिकारी जॉन चेन यांनी सांगितले.

या फोनसाठी ५.२ इंची फुल एचडी आयपीएस एलपीटीएस डिस्प्ले दिला गेला आहे. ३ जीबी रॅम, अड्रेनो ४०५ जीपीयू, १६ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने ५१२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा यात दिली गेली आहे. ड्युअलटोन एलईडी फ्लॅश पीडीएफ १३ एमपीचा रिअर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनची किमत २९९ डॉलर्स म्हणजे २० हजार रूपये असून तो सध्या अमेरिका, कॅनडा, यूके, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, नेदरलँड देशात प्री ऑर्डर बुकींगसाठी उपलब्ध करून दिला गेला आहे. ८ ऑगस्टपर्यंत प्री बुकींग करणार्‍या ग्राहकांना कंपनी ५९.९९ डॉलर्स किमतीचे ब्लॅकबेरी मोबाईल पॉवर पॅक फ्री देणार आहे.

Leave a Comment