ब्रिस्टल कार्सची नवी बुलेट स्पीडस्टर कार

bullet
ब्रिटीश कंपनी ब्रिस्टल कार्सने तब्बल १२ वर्षांनंतर त्यांची नवी कार बुलेट स्पीडस्टर नावाने बाजारात आणली असून या कारची फक्त ७० युनिट बनविली जाणार आहेत. या कारची किंमत आहे २,५००० पौंड म्हणजे २ कोटी २० लाख रूपये. या कांरमध्ये ओल्ड फॅशन्ड आकर्षक इंटिरियरला टच स्क्रीन मुळे एक वेगळाच मॉडर्न लूक आला आहे.

या कारमधील बहुतेक सर्व भाग हाताने बनविले गेले आहेत. म्हणजे ही हँडबिल्ट कार आहे. तिला बीएमडब्ल्यू नॉन टर्बो ४.८ लिटर व्ही ८ इंजिन दिले गेले आहे. ही कार ० ते १०० किमीचा वेग ३.८ सेकंदात घेऊ शकते आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी २५० किमी. ७० -८० च्या दशकातील मॉडेल्सची आठवण देणारी ही कार दिसायला खूपच आकर्षक आहे. कारमधील सीट अत्यंत आरामदायी आणि उत्कृष्ठ दर्जाच्या लेदरपासून बनविल्या गेल्या आहेत. ही कार किंमतीला जादा असली तरी ती हातोहात विकली जाईल अशी खात्री कंपनीने दिली आहे.

Leave a Comment