इन्फोसिस कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणार शेअर्सचा लाभ

infosys
बंगळुरु: कर्मचाऱ्यांना कंपनीच्या वाढीत सामील करुन घेण्याच्या उद्देशाने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी इन्फोसिसने त्यांना दरवर्षी शेअर्सचे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून तब्बल तेरा वर्षांनंतर कर्मचाऱ्यांना नुकतेच शेअर्सचे वाटप केल्यानंतर कंपनीने पुढील चार ते पाच वर्षांसाठी ही योजना हाती घेतली आहे.

कर्मचाऱ्यांना कंपनीच्या प्रगतीत आम्हाला सामील करुन घ्यायचे आहे. परंतु ते एकाचवेळी शक्य नाही. सध्या आम्ही पुढील चार ते पाच वर्षांकरिता कर्मचाऱ्यांना शेअर्सचे वाटप करण्याचा निर्णय घेतला असून शेअर्स संबंधीची कोणतीही योजना सातत्याने कार्यरत असली तेव्हाच त्याचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो, असे मत कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे अधिकारी कृष्णमुर्ती शंकर यांनी व्यक्त केले.

Leave a Comment