सोनी एक्स्पेरिया एक्सए अल्ट्रा भारतीय बाजारपेठेत दाखल

sony
नवी दिल्ली : आपला नवीन ‘एक्स्पेरिया एक्सए अल्ट्रा’ हा नवा स्मार्टफोन मोबाईल उत्पादन क्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘सोनी’ने भारतीय बाजारापेठेत दाखल केला असून हा स्मार्टफोन तरुणाईला नक्कीच भुरळ पाडेल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ६ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला असून यात ३ जीबी रॅम, मीडियाटेक हेलिओ पी १० एसओसी प्रोसेसर आणि २१.६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ऍन्ड्रॉईड मार्शमेलॉ ६.० ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आले आहे. भारतीय बाजारपेठेत याची किंमत २९,९९० रुपये ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment