सायन रुग्णालयात सयामी बाळांचा जन्म

babay
मुंबई – मुंबईतील सायन रुग्णालयात एका महिलेने एक शरीर आणि दोन तोंड असलेल्या सयामी बाळांना जन्म दिला आहे.

एका महिलेने सायन रूग्णालयात रात्री सयामी जुळ्यांना जन्म दिला आहे. या महिलेचे नाव शाहीन खान असे आहे. या दोन बाळांपैकी एका बाळाची संपूर्ण वाढ झाली आहे, तर दुस-या बाळाचे तोंड, छाती आणि पोटाकडचा भाग पहिल्या बाळाला जोडला गेला आहे.

या बाळाला दोन तोंडे आणि तीन हात आहेत. तसेच फुफ्फुस, संडासची जागाही एकच असून दोनच किडन्या आहेत. श्वसननलिका दोन असल्या तरी पाय केवळ दोन आहेत. ऑपरेशन केले तर धोका संभवत असल्याने यावर संपूर्ण विचार करुन ऑपरेशन करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. या बाळाला विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र बाळाचे ऑपरेशन करायचे की नाही यासंदर्भात निर्णय झालेला नाही. वजन साडेचार किलो इतके असुन बाळ आणि बाळंतीण या दोघांचीही प्रकृती चांगली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment