रिलायन्सने लाँच केला लाईफ सीरीजचा नवा फोन

reliance
नवी दिल्लीः लाईफ सीरीजचा नवा स्मार्टफोन ‘लाईफ वॉटर ८’ रिलायन्सने लाँच केला असून स्मार्टफोनप्रेमींना या फोनचा जबरदस्त लूक आकर्षित करत आहे. या फोनला मेटल बॉडी फ्रेम असून शानदार फीचर्सचा समावेश आहे.

‘लाईफ वॉटर ८’ या फोनच्या फीचर्सच्या तुलनेत किंमत अगदी कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन आकर्षित करत आहे. या फोनची किंमत केवळ १० हजार ९९९ रुपये आहे.

या फोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले, अँड्रॉईड ५.१ लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम, एलईडी फ्लॅशसह १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, ३ जीबी रॅम आणि १६ जीबीची इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहे.

Leave a Comment