या बर्गर गर्ल साठी लागतात रांगा

taiwan
तैवान येथील सु काऊशुंग शहरातील मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट सध्या सोशल मिडीयावर बरेच गाजते आहे. या रेस्टॉरंटची किर्ती येथे मिळत असलेल्या विशिष्ठ पदार्थांमुळे नाही तर ती आहे या रेस्टॉरंटच्या कौंटरवर काम करणार्‍या एका सुंदर मुलीसाठी. सुवेहान नावाची ही सेल्सगर्ल. तिच्याकडे जो कुणी पाहतो तो पाहातच राहतो कारण ती अगदी आयडील बार्बी डॉलसारखीच दिसते.

सुवेहानचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. ती ज्या कौंटरवर काम करते तेथे ग्राहकांची भली मोठी रांग असते, ती तिच्याच हातून आपल्याला बर्गर मिळावा यासाठी. तिला बर्गर गर्ल असेही नांव मिळाले आहे. शिवाय ग्राहक तिला वेईवेई, हेतून या नावांनीही पुकारतात. गेल्या काही महिन्यांपासून सुवेहानचे फोटो सोशल मिडीयावर झळकत आहेत. तिचे इंस्टाग्राम अकौंटही आहे आणि आजमितीला या अकौंटवर तिचे १ लाख ११ हजार फॉलोअर आहेत.

Leave a Comment