कोल्ड ड्रिंक आणि फ्रूट ज्युसेस विक्रीचे बाजारातील गेल्या सहा महिन्यातील आकडे कोल्ड ड्रीक्सच्या तुलनेत फ्रूट ज्यूसची विक्री वेगाने वाढत चालल्याचे दर्शवित असल्याचे नेल्सनने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. रियल, स्लाईस, ट्राॅपिकाना या ज्यूस ब्रँडसची सर्वाधिक विक्री होत असल्याचेही दिसून आले आहे. सर्वाधिक खपाच्या पाच ब्रेवरीजमध्ये पेप्सी व कोलापेक्षा या फ्रूट ज्यूस ब्रँडनी आघाडी घेतली आहे.
कोल्डड्रींकना मागे टाकत ज्यूस विक्री आघाडीवर
मार्केट तज्ञांच्या मते पारंपारिक पेयांना पुन्हा उर्जितावस्था येऊ लागल्याचे हे लक्षण आहे. डाबरचे रियल, पेप्सिकोचे स्लाईस मँगो व ट्राॅपिकाना ज्यूसला ग्राहकांकडून चांगली मागणी येत असून हे ब्रँड विक्रीचे नवे रेकॉर्ड करत आहेत. टँग पावडर तसेच हमदर्दचे रूह अफजा हेही पाच टॉप ब्रँड मध्ये सामील झाले आहेत. गेल्या चार वर्षांतील आकडेवारी पाहिली तर १३-१४ सालात पेप्सी व गतवर्षी कोक टॉपवर होते मात्र आता त्यांची लोकप्रियता आणि विक्री घटलेली दिसून येत आहे.