मान्सून समाधानकारक तरीही कांही राज्यात दुष्काळ

dushkal
गेली दोन वर्षे हुलकावणी देत असलेला मान्सून यंदा समाधानकारक बसरत असला तरीही देशाच्या कांही राज्यात यंदाही दुष्काळसदृश स्थिती असेल असा इशारा क्रिसिलने दिला आहे. ड्राॅप्स ऑफ होप या नावाने क्रिसिलने केलेल्या संशोधनात ही बाब स्पष्ट झाली आहे.

या अहवालानुसार यंदा गुजराथ, ओडिशा राज्यात दुष्काळग्रस्त स्थिती असेल व थोडी फार तशीच परिस्थिती आसाम, हिमाचल व केरळ राज्यातही असेल. देशातील ८ राज्यातील ८९ जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खरीपावर प्रभाव पडण्याची शक्यताही यात वर्तविली गेली आहे. मात्र देशात बहुतेक ठिकाणी भूजल पातळीत वाढ झालेली दिसून येत असल्याने कृषी उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत किमान ४ टक्के वाढणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यात आत्तापर्यंत सरासरी एवढा अथवा थोडा कमी पाऊस झाला असला तरी शेती लागवडीखालचे क्षेत्र यंदा वाढलेले व बर्‍याच ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या असल्याचेही या अभ्यासात दिसून आले आहे.

Leave a Comment