भारतात सुरु होणार अॅपल स्टोअर

apple-store
मुंबई : भारतातील अॅपल या जगप्रसिद्ध मोबाईल कंपनीची बाजारपेठ वाढल्यामुळे भारतात लवकरच अॅपल स्टोअर सुरू करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. अॅपलचे जगभरातील ग्राहक गेल्या काही महिन्यात कमी झाले झाले असले करी भारतात मात्र अॅपलच्या ग्राहकांमध्ये वाढ झाली आहे.

२७ टक्के अॅपल आयफोनच्या विक्रीत घसरण झाली आहे. ही घसरण तब्बल ७.८ अब्ज डॉलर इतकी होती. २०१६मध्ये ४.०४ कोटी आयफोनची विक्री झाली आहे. तर २०१५मध्ये याच काळात ४.७५ कोटी आयफोनची विक्री झाली होती. भारतात गेल्या वर्षभरात अॅपल आयफोनची विक्री ५१ टक्क्यांनी वाढल्यामुळे कंपनीने अॅपल स्टोअर भारतात सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी दिली.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालामध्ये भारताची बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गेल्या तिमाहीमध्ये ५१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे नमूद केले आहे. भारतात अॅपल स्टोअर सुरु करुन भारतातील बाजारपेठ वाढवण्याचा प्रयत्न कंपनी करणार असल्याचे कुक म्हणाले.

Leave a Comment