सोलॅरिन – सर्वाधिक सुरक्षित स्मार्टफोन

solatin
ब्लॅकबेरी आणि गुगल नेक्सस पेक्षाही आपला फोन अधिक सुरक्षित असल्याचा दावा करणार्‍या इस्त्रायली स्टार्टअप कंपनी सिरीन लॅब ने त्यांचा सोलॅरिन स्मार्टफोन लंडनमधील एका कार्यक्रमात मंगळवारी लाँच केला आहे. विशेष म्हणजे स्मार्टफोन कंपन्या स्मार्टफोनच्या किमतींबाबत अधिक जागरूक असताना सिरीनने त्यांच्या या स्मार्टफोनची किंमत १४ हजार डॉलर्स म्हणजे ९ लाख रूपये ठेवली आहे. हा फोन सायबर गुन्हेगारांसाठी आव्हान असल्याचे सिरीन लॅबचे उपाध्यक्ष फेडरीक यांनी घोषित केले असून कोणताच सायबर गुन्हेगार या फोनवर हल्ला करू शकत नाही असे जाहीर केले आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार या अँड्राईड स्मार्टफोनसाठी २५६ बिटचीपवरून चिप इनक्रिप्शन करता येते व असे फिचर असलेला हा फोन लष्करासाठी सेफ कम्युनिकेशनचे माध्यम ठरू शकणार आहे. स्मार्टफोन जगतातला रोल्स राईस असे या फोनचे कौतुक केले गेले आहे. या फोनसाठी ५.५ इंची आयपीजी एलईडी २ के रेझोल्युशनचा स्क्रीन दिला गेला आहे. अँड्राईड ५.१ ओएस, २३ एमपीचा रिअर व ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा,४ जीबी रॅम,, १२८ जीबी इंटरनल मेमरी, ४०४० एमएएच बॅटरी अशी फिचर्स आहेत.हा फोन अधिक सुरक्षित आहे कारण फोनचा मालक जापेर्यंत फोनच्या मागे विशिष्ट ठिकाणी स्पर्श करत नाही तोपर्यंत हा फोन ऑन होतच नाही.

या फोनमध्ये टायटॅनियम, कार्बन, लेदर व खर्‍या सोन्याचा वापर केला गेला आहे.

Leave a Comment