सोलर इंपल्स-२ ने इंधनाशिवाय पूर्ण केली पृथ्वीची प्रदक्षिणा

solar
अबुधाबी – सौर ऊर्जेने संचालित विमान सोलर इंपल्स-२ ची ऐतिहासिक यात्रा पूर्ण झाली असून जगाला इंधनाच्या एकही थेंबाचा वापर न करता फेरी घालणारे हे पहिले विमान ठरले. मागील वर्षी हे विमान स्वच्छ इंधनाचा संदेश घेऊन जगाच्या सफरीवर निघाले होते. या कामगिरीसाठी संयुक्त राष्ट्राचे महासचिव मून यांनी वैमानिकाचे अभिनंदन केले.

संयुक्त अरब अमिरातची राजधानी अबु धाबीत विमान उतरले. अबु धाबी येथे इजिप्तची राजधानी कैरोहून पोहोचण्यास ४८ तासांपेक्षा अधिक वेळ विमानाला लागला. या विमानाने मागील वर्षी ९ मार्च रोजी अबु धाबीहूनच आपला प्रवास सुरू केला होता. विमान अल-बातीन विमानतळावर उतरल्यावर स्विस वैमानिक बटेंड पिकार्ड यांचे मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले.

२७६३ किलोमीटरच्या प्रवासादरम्यान सोलर इंपल्स हे लाल सागर, सौदीचे वाळवंट आणि खाडीला पार करत कैरोहून अबु धाबीत पोहोचले. सोलर इंपल्सने ऊर्जेच्या इतिहासात मोठा पल्ला गाठला आहे. आता आमच्याजवळ योग्य तोडगा आणि तंत्रज्ञान आहे. आम्ही जगात प्रदूषण स्वीकारू नये असे पिकार्ड यांनी म्हटले.

Leave a Comment