सप्टेंबरमध्ये पृथ्वीजवळच्या लघुग्रहावर झेपावणार नासाचे अंतराळयान

nasa
वॉशिंग्टन – येत्या सप्टेंबरमध्ये एक यान अंतराळातील पृथ्वीच्या अगदी जवळच्या लघुग्रहावर अमेरिकन अंतराळ संस्था नासा सोडणार आहे. बेन्नू असे या लघुग्रहाचे नाव असून नासा पृथ्वीच्या या जवळच्या लघुग्रहाच्या पृष्ठभागाच्या नमुने गोळा करणार आहे. हे यान परत आल्यानंतर त्या लघुग्रहावर जीवसृष्टीचे लक्षणे आहेत का याची पाहणी या नमुन्याद्वारे करणार आहे.

नासाचे ओसिरिस-रेक्स हे अंतराळ यान बेन्नू या लघुग्रहावरील खनिजे आणि आण्विक घटकांचे नमुने गोळा करणार आहे. या यानातील इन्फारेड किरणे या लघुग्रहावर सोडेल. त्याच्या माध्यमातून येथील वस्तुंची, खनिजांची, दगडांची, मातीची दृश्ये सुस्पष्ट घेईल. तसेच यानातील रेडिओलहरीच्या माध्यमातून येथील प्रकाशाचे विभाजन कसे होते याचा ही अभ्यास करेल. तसेच या नमुन्याच्या माध्यमातून नासा या ठिकाणी जीवसृष्टी राहू शकते का किंवा होती का याचा अभ्यास करणार आहे.

या यानातील ओव्हीरस हे ऑरगॅनिक शोधण्याची गुरुकिल्ली आहे. आम्ही याच्या माध्यमातून बेन्नू या लघुग्रहाची सामान्य रचना समजून घेण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होणार असल्याचे टुस्कान येथील अॅरिझोना विद्यापीठाचे प्राचार्य आणि या मोहिमेचे प्रमुख लॉरियट यांनी सांगितले.

Leave a Comment