मायक्रोमॅक्सचे दोन लॅपटॉप बाजारपेठेत दाखल

micromax
नवी दिल्ली – मायक्रोमॅक्स इग्नाइट आणि मायक्रोमॅक्स अल्फा नावाचे दोन लॅपटॉप फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स संकेतस्थळावर मायक्रोमॅक्स या भारतीय कंपनीने दाखल केले आहेत. इग्नाइट सीरिजमधील मायक्रोमॅक्स इग्नाइट एलपीक्यू६१ या लॅपटॉपची किंमत १८९९० रुपये आहे. हा नवीन लॅपटॉप इंटेल आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने बाजारात आणण्यात आला आहे. या लॅपटॉपमध्ये विन्डोज १० ही ऑपरेटिंग प्रणाली असून १४ इंच एचडी डिस्प्ले आणि इन्टेल पेन्टीयम एन ३७०० प्रोसेसर आहे. तसेच इन्टेल एचडी ग्राफिक्स असून ४ जीबी क्षमतेची डीडीआर ३ रॅम आहे.

दोन यूएसबी ३.० पोर्ट्स असून एक मायक्रो एचडीएमआय पोर्ट, मायक्रोएसडी कार्ड रिडर, ब्लुटुथ ४.०, ३.५ ऑडियो जॅक, एचडी वेबकॅम, स्टिरिओ स्पीकर्स असून हा लॅपटॉप केवळ ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. लॅपटॉपमध्ये स्टोरेजची चांगली सुविधा देण्यात आली ती १ टीबी एचडीडी आहे. भारतीय ग्राहकांना लक्ष्य ठेऊन हा लॅपटॉप आणण्यात आला असून नव्यानेच लॅपटॉपचा वापर करणाऱयांसाठी हा उपयुक्त असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Comment