मुंबई : इंटेक्सचा अॅक्वा रिंग स्मार्टफोन केवळ ३,९९९ रुपयांत अमेझॉन इंडिया ऑनलाईन शॉपिंग संकेतस्थळावर उपलब्ध झाला आहे. इंटेक्सने अॅण्ड्रॉइड ६.० मार्शमेलो प्रणालीवर कार्य करणारा अॅक्वा रिंग स्मार्ट फोन बाजारात आणला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या या किंमतीच्या अन्य स्मार्ट फोनच्या तुलनेत अॅक्वा रिंगमध्ये गेमिंग आणि मल्टिटास्किंगचा अनुभव चांगला असल्याचा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे.
३९९९ रुपयात इंटेक्सचा अॅक्वा रिंग
अॅक्वा रिंगमध्ये हा ५ इंचाचा डिस्प्ले ज्याचे रेझोल्युशन १२८० x ७२० पिक्सल आहे. यात १.३ गेगाहर्ट्स क्वाडकोर मीडियाटेक MTK6580A प्रोसेसर देण्यात आल असून १ जीबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी स्टोअरेज देखील देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा ५ मेगापिक्सलचा तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे.