स्नॅपडील रिटर्न-रिफंड पॉलिसीसाठी सर्वोत्तम

snapdeal
नवी दिल्ली – रिटर्न आणि रिफंड पॉलिसीसाठी ई-कॉमर्स क्षेत्रातील पहिल्या तीन कंपन्यांपैकी स्नॅपडील ही सर्वात सर्वोत्तम असल्याचे समोर आले असून देशातील सर्वात मोठी मिस्टी शॉपिंग कंपनी चॅनलप्लेच्या अहवालातून हे प्रकाशात आले आहे. मे-जून २०१६ दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि देशातील २० शहरांना सहभागी करण्यात आले होते. मेट्रो, टियर १ आणि टियर २ शहरांतील लोकांना या सर्वेक्षणात सहभागी करण्यात आले होते. याव्यतिरिक्त सर्वेक्षणात इलेक्ट्रॉनिक्स, अपेरल आणि होम डेकोर प्रकारातील उत्पादनांना सहभागी करण्यात आले होते.

या अहवालानुसार रिफंड देण्यासाठी लोकांनी स्नॅपडील या कंपनीला पसंती दिली आहे. स्नॅपडील केवळ २.३ दिवसात पैसे परत करते. याबाबतीत फ्लिपकार्टला साधारण २.९ दिवस आणि अमेझॉनला ४.५ दिवस लागतात. स्नॅपडीलमध्ये रिफंड प्रक्रिया सुरू होण्यास एका दिवसात ८० टक्के रिफंड करते. फ्लिपकार्टचा हा आकडा ७७ टक्के आणि अमेझॉन ५५ टक्क्यांवर आहे.

त्याचबरोबर स्नॅपडील रिव्हर्स पिक-अपच्या बाबतीत सर्वात वेगवान आहे. स्नॅपडील अन्य कंपन्यांच्या तुलनेत ५ ते ७ तास पुढे आहे. स्नॅपडीलच्या वेबसाइटवर रिटर्नसाठी विनंती केल्यास एका दिवसाच्या आत ८३ टक्के रिवर्स पिक-अप करण्यात येते. फ्लिपकार्ट ७९ टक्के एका दिवसात, तर अमेझॉन ७८ टक्के करते.

Leave a Comment