विश्व विक्रम बनवणार हा ७ फुटाचा कुत्रा

great-dane1
मुंबई : छायाचित्रात दिसत असलेला हा कुत्रा ब्रिटेनमधील साऊथ वेल्सच्या पेनमाएनमध्ये राहणारा असून या कुत्र्याचे नाव मेजर आहे. त्याची उंची ७ फूट आणि वजन ७६ किलो आहे. हा जगातील सर्वात उंच कुत्रा असल्याचा दावा त्याचे मालक ब्रायन आणि जूली विलियम्स करत आहेत. विशेष म्हणजे हा कुत्रा खूपच आळशी आहे. तो २२ तास झोपतो. अनेकदा तर तो स्वत:च्याच सावलीने घाबरुन जातो.
great-dane
कुत्र्याचे मालक याबाबत सांगतात की, याची उंची अजून वाढत असून लवकरच त्याचे नाव गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकार्ड्समध्ये येणार आहे. ७ फुटाचे आणखी २ अन्य कुत्रे देखील अस्तित्वात आहेत. एक एसेक्समध्ये तर दूसरा अमेरिकेत आहे. अमेरिकेचा ग्रेट डेनचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे.