मुंबई : ‘सीबीईसी’ अर्थात ‘सेंट्रल ब्युरो ऑफ एक्साईज आणि कस्टम’ने शाहरुख खाननंतर बॉलिवूडच्या आणखी काही सेलिब्रेटींना नोटीस बजावली आहे. ही नोटीस सर्व्हिस टॅक्स चुकवल्याची असून आमिर खान, रणवीर सिंग, सलमान खान, यश राज फिल्म्स यांना सेवा कर चुकवल्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. या अभिनेत्यांनी चार वर्षांत सुपरहिट चित्रपट दिले पण सेवा कर भरलेला नाही. बजरंगी भाईजान, सुलतान, पीके, यांसारखे चित्रपट हिट झाले, पण त्याचा सेवा कर भरले नसल्याचे नोटीशीत म्हणण्यात आले आहे.
‘करचुकव्या’ सेलिब्रेटींना सीबीईसीचा दणका
आमिर, रणवीर यांसारख्या कलाकारांना दिल्या गेलेल्या मानधनाची माहिती देण्याचे आदेश फिल्म प्रॉडक्शन हाऊसेसना देण्यात आला आहे. तसेच बॉलिवूड कलाकारांनाही यशराज फिल्म्स, सलमान खान फिल्म्ससारख्या बॅनर्सकडून मिळालेल्या मानधनाची माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.