सॅमसंगचा १० हजारांपेक्षाही कमी किमतीचा गॅलक्सी जे२ प्रो लाँच

samsung
नवी दिल्लीः गॅलक्सी जे २ प्रो हा स्मार्टफोन सॅमसंगने भारतात लाँच केला असून केवळ ९ हजार ९८० रुपये ऐवढी या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे. २६ जुलैपासून हा फोन स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. सॅमसंगने काही दिवसांपूर्वी या फोनचे व्हर्जन गॅलक्सी जे२ स्मार्टफोन लाँच केला होता. त्यानंतर भारतात हा नवा फोन आणला आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी लाईटची रिंग देण्यात आली आहे. मोबाईलवर नॉटीफिकेशन येताच ही एलईडी स्क्रीन सूचना करते.

Leave a Comment