फ्लिपकार्टची झाली जबाँग

flipkart
नवी दिल्ली – आता प्रतिस्पर्धी ऑनलाइन रिटेल कंपनी ‘जबाँग’चा ई-कॉमर्स क्षेत्रात आघाडीवर असलेल्या फ्लिपकार्टच्या युनिट ‘मिन्त्रा’ ताबा घेणार असून या करारावर दोन्ही कंपन्यांनी सही केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. अनेक मोठ्या कंपन्यांनी जबाँगची खरेदी करण्यासाठी पसंती दर्शवली होती. फ्लिपकार्ट व्यतिरिक्त फ्यूचर ग्रुप, स्नॅपडील तसेच आदित्य बिर्ला ग्रुपच्या मालकीचे अबॉफ या शर्यतीत होते. मात्र इतरांना मागे टाकत फ्लिपकार्टने जबाँगची खरेदी केली आहे.

फ्लिपकार्ट जबाँगची खरेदी करुन ई-कॉमर्स क्षेत्रातील आपले वजन वाढवण्याचा प्रयत्न करेल. याआधी फ्लिपकार्टने मिन्त्रा ताब्यात घेऊन फॅशनच्या क्षेत्रातील मोठ्या बाजारपेठेवर ताबा मिळवला आहे. २०१२मध्ये जबाँगची सुरुवात जर्मन इन्क्युबेटर रॉकेट इंटरनेटच्या बॅनरखाली करण्यात आली होती. ऑनलाइन रिटेलिंगमध्ये सुरुवातीला प्रसिद्ध झालेले ऑनलाइन पोर्टल जबाँगची गेल्या वर्षभरापासून घसरण सुरु आहे. खरेदीत झालेली घट तसेच मॅनेजमेंटमध्ये झालेले बदल घसरण होण्यास कारणीभूत ठरले आहेत. गतवर्षी जबाँगचे सह-संस्थापक अरुण चंद्रा मोहन आणि परवीन सिन्हा यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर संजीव मोहंती यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली होती.

Leave a Comment