नवी दिल्ली : नुकतीच आपली लॉजीचे वर्ल्ड एडिशन फ्रेंच कारनिर्माता कंपनी रेनॉल्टने लॉन्च केली आहे. रेनॉल्टची लॉजी ही मल्टी परपज व्हेईकल असून या कारमध्ये ८५PS आणि ११०PS दोन इंजिन पर्याय उपलब्ध असतील.
रेनॉल्ट लॉन्च केले लॉजीचे वर्ल्ड एडिशन
रेनॉल्टने दावा केलेले २५ नवीन फिचर्सही या कारमध्ये देण्यात आले आहेत. या नवीन बदलांमुळे एक्सटिरिअर आणि इंटिरिअरला फायदेशीर असेल. या गाडीची किंमत ९.७४ लाखांपासून १०.४० लाखांपर्यंत आहे. भारतातील रस्त्यांच्या अनुषंगाने या गाडीची निर्मिती करण्यात आली असून फेअरी रेड, रॉयल ऑर्किड, पर्ल व्हाईट आणि मुनलाईट सिल्वर या रंगामध्ये उपलब्ध असेल.
या गाडीच्या बाह्यभागाचा विचार करता क्रोम सॅटीन गार्निश असलेले फॉग लँप, २ टोन एरोडायनॅमिक बंपर, R१५ नेप्टा फिनीश अलोय व्हीलसोबत अनेक नवीन फिचर्स असतील. तसेच याचे मायलेजही जवळपास २० किमी प्रतिलिटर असेल. या कारसोबत रेनॉल्टने ३केअर मेंटेनंस पॅकेज दिले आहे. ३ वर्षांपर्यंत किंवा ६० हजार किमीपर्यंतच्या या पॅकेजसाठी ग्राहकांना २२,१४२ रूपये मोजावे लागणार आहेत.