मोदींसह भारतीय सेलिब्रिटींच्या फोटोंची पाकने केली विटंबना

shahrukh
नवी दिल्ली – दहशतवादी बुरहाण वाणीला भारतीय जवानांनी ठार केल्यानंतर काश्मिरात आंदोलन उसळले. पण जवानांनी आंदोलन थांबवण्यासाठी केलेल्या पॅलेट गनच्या वापरामुळे एकच हाहाकार उडवून दिला. आंदोलकांना या पॅलेट गनमधील छर्र्यांमुळे मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. अनेकांनी डोळे गमावल्याच्या बातम्याही येत आहेत.

जखमी आंदोलकांचे या प्रकारानंतर जे फोटो समोर आले त्यानंतर अनेक स्तरातून क्रोध व्यक्त होत आहेत. अशा प्रकारे अमानुषपणे आंदोलकांना जखमी केल्याचा सगळचे निषेध करत आहेत. फेसबूकवर या संपूर्ण प्रकरणाचा वेगळ्या प्रकारे निषेध सुरू आहे. चित्रपट, क्रिकेट क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि प्रमुख नेत्यांच्या फोटोंना पॅलेट गनच्या हल्ल्यात जखमी झाल्याचा इफेक्ट देऊन त्यांच्या प्रतिक्रिया मांडून हा निषेध केला जातोय. यामध्ये अगदी मोदींपासून, बिग बी, शाहरूख, कोहली अशा सेलिब्रिटींचे फोटो वापरण्यात आले आहेत. त्यावर विशेष मॅसेजही लिहिण्यात आले आहेत. पाहुयात नेमकं काय म्हणायचे आहे यांना. फेसबूकच्या या पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोंबाबत यूझर्सने काही प्रतिक्रियाही व्यक्त केलेल्या आहेत.