लवकरच बाजारात येणार जग्वारची पहिली एसयूव्ही एफ फेस

jaguar
नवी दिल्ली : आपली पहिली नवी एसयूव्ही एफ फेस भारतामध्ये जगप्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी जग्वार लँडरोव्हर लवकरच लाँच करणार असून भारतीय वेबसाइटवर लाँच होणा-या एफ फेस या मॉडेलची माहिती देण्यात आली आहे. भारतामध्ये ही एसयूव्ही दिवाळीच्या दरम्यान लाँच करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. या एसयूव्हीमध्ये २.० लिटरचे पेट्रोल टर्बोचार्ज्ड इंजिन, २०४ बीएचपी शक्तीसह ३.० लिटर डिझेल इंजिन, ८ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, सिकव्हेंशन शिफ्ट ऑल व्हिल ड्राइव्ह सेट-अप अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.