रेल्वे प्रवासादरम्यान ज्ञान आणि मनोरंजनासाठी ‘रेल्वे रेडिओ सेवा’

railway
नवी दिल्ली – आता आपली पसंतीचे एफएम रेडिओ चॅनेल रेल्वेतून प्रवास करताना प्रवासी ऐकू शकतात. रेल्वेत प्रवासादरम्यान ज्ञान आणि मनोरंजनासाठी भारतीय रेल्वेने ‘रेल्वे रेडिओ सेवा’ सुरू करण्याची योजना बनविली असून आणीबाणी आणि आपातस्थितीत ही सेवा उपयुक्त ठरू शकते.
प्रीमियर सेवा रेल्वेसहित जवळपास १००० मेल आणि एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये ही सुविधा सुरू करण्याची योजना सरकारी परिवहन यंत्रणेने बनविली आहे. योजनेनुसार डबयांमध्ये लावण्यात आलेल्या सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीवर प्रवासी लोकप्रिय गीत-संगती ऐकू शकतील, त्याचबरोबर प्रत्येक तासाला रेल्वेसंबंधी नवीन माहिती मिळवू शकतील. या प्रणालीचा वापर आणीबाणीच्या स्थितीत इशारा देण्यासाठी केला जाईल.

रेल्वे रेडिओ सेवेंतर्गत विनोद, ज्योतिष आणि इतर सामान्य ज्ञानाबरोबरच भारतीय रेल्वेचा इतिहास तसेच मुख्य घडामोडींची माहिती उपलब्ध करण्यात येईल. राजधानी, शताब्दी आणि दूरंतो समवेत जवळपास १००० मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेंमध्ये प्रवास करणाऱया प्रवाशांना मनोरंजन तसेच माहिती उपलब्ध करविण्याच्या उद्देशाने काही प्रमुख एफएम रेडिओ चॅनेल्ससोबत या व्यवस्थेला अंतिम रुप देण्याच्या प्रक्रियेत असल्याचे एका अधिका-याने सांगितले.

आपल्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय भाषणात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेत सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे गाडीतच मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करविण्यासाठी एफएम रेडिओ चॅनेलांना आमंत्रित करण्याचा प्रस्ताव दिला होता. सध्या केवळ राजधानी, दूरंतो आणि शताब्दी रेल्वेगाडय़ांमध्येच पीए प्रणालीची सुविधा आहे. रेल्वे रेडिओ सेवा सुरू होताच सर्व रेल्वे या प्रणालीने जोडले जातील. योजनेनुसार रेल्वेबोर्डात स्टुडिओ बनविले जातील आणि सर्व क्षेत्रीय मुख्यालयांमधून रेल्वे रेडिओ सेवेचे संचालन होईल.

Leave a Comment