मुंबई – आता बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान काळा पैसा भारतात आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या मोहिमेत आयकर विभागाच्या निशाण्यावर असल्याचे दिसत असून आयकर विभागाने शाहरुख खानला नोटीस पाठवली आहे. परदेशात करण्यात आलेल्या गुंतवणुकीची माहिती शाहरुख खानला पाठवण्यात आलेल्या या नोटीसमध्ये देण्यास सांगण्यात आले आहे.
काळा पैसा; आयकर विभागाच्या निशाण्यावर शाहरुख ?
याबाबत इकॉनॉमिक टाईम्स इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बर्मुडा, ब्रिटीश वर्जिन आयलँड आणि दुबईत शाहरुख खानने केलेल्या गुंतवणुकीची माहिती आयकर विभागाने मागितली आहे. परदेशात गुंतवणूक करणा-या भारतीयांची आयकर विभागाकडे मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. मात्र शाहरुख खानने आपली परदेशातील संपत्ती लपवली असल्याचा कोणता पुरावा आयकर विभागाकडे उपलब्ध आहे का ? हे अजून स्पष्ट झालेले नसून त्याला ही नोटीस आयकर विभाग कायदा १३१ कलम अंतर्गत पाठवण्यात आली आहे, ज्यामध्ये आयकर विभागाच्या अधिका-यांनी चौकशी करण्याचा अधिकार आहे.