माल्ल्याच्या ८ गाड्यांचा लिलाव

vijay-mallya
मुंबईः कोट्यवधी रुपयांचा बँकांना चूना लाऊन परदेशी फरार झालेल्या विजय माल्ल्याच्या ताफ्यातील एक-एक वस्तूंचा आता लिलाव व्हायला सुरुवात झाली असून माल्ल्याच्या ८ गाड्यांचा ‘एसबीआय कॅप’ युआर ही कंपनी लिलाव करणार आहे. माल्ल्याने १७ कोटींहून अधिक रुपयांचा चूना लावून परदेशात पळाला आहे. या गाड्यांचा लिलाव २५ ऑगस्ट रोजी होणार असून यातून ‘एसबीआय कॅप’ कंपनीला १३.७० लाखांची किंमत अपेक्षित आहे. माल्ल्याकडून एसबीआय बँकेला ६ हजार ९६३ कोटींचे येणे बाकी आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचे कर्ज चुकवण्यासाठी ईडीने १४११ कोटींची संपत्ती जप्त केली होती.

Leave a Comment