फ्लिपकार्टची डिजिटल पेमेंट बिझिनेसमध्ये गुंतवणूक

flipcart
ऑनलाईन शॉपिंग फ्लिपकार्टने पुढच्या तीन वर्षात स्वतंत्र डिजिटल पेमेंट बिझिनेस साठी ६७० कोटी रूपयांची गुंतवणूक योजना तयार केली आहे. कॅश व्यवहार कमी करणे व वाढत्या ऑनलाईन पेमेंट मार्केटचा फायदा उठविणे हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

कंपनीचे सीईओ बिन्नी बंसल या संदर्भात माहिती देताना म्हणाले की डिजिटल वॉलेट प्रमाणे काम करणारा एक प्रॉडक्ट कंपनी लवकरच लाँच करत आहे. त्यामुळे ग्राहक बिनाकार्ड वा नेटबँकींग सेवा न वापरताही ऑनलाईन पेमेंट करू शकतील. यावर्षी एप्रिलमध्येच फ्लिपकार्टने पेमेंट स्टार्टअप फोन पेची खरेदी केली आहे. कंपनीने दीर्घकालीन धोरणे आखण्यावर व राबविण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले असल्याचेही बन्सल यांनी सांगितले.

Leave a Comment