पुढील महिन्यात हवामानाचा अचूक अंदाज घेणारा उपग्रह अवकाशात

isro
पुढील महिन्यात हवामान उपग्रह भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो) अवकाशात सोडणार असून ‘जिओसिंकरनस सॅटेलाईट लाँच व्हायकल’ (जीएसएलव्ही-एमके २) या रॅकेटद्वारे हे उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार असल्याची माहिती इस्त्रोचे प्रमुख ए. एस. किरण कुमार यांनी दिली.

किरण कुमार मद्रास तंत्रज्ञान संस्थेतील एका बैठकीदरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या हवामान उपग्रहाचे नाव आयएएसएटी-३डीआर असे असणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पुढे ते म्हणाले, की उपग्रह निर्मिती आणि उपग्रहवाहू रॅकेट निर्मितीमध्ये वाढ होत असून, प्रत्येक वर्षी १२ ते १८ पर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. हवामानाचा अचूक अंदाज घेणारे आणि हवामान्याचे निरिक्षण नोंदविणाऱ्या स्कॅटसॅटचे लवकरच निर्मिती करण्यात येणार आहे, असे विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे प्रमुख के सिवन यांनी सांगितले. दोन्हीही उपग्रही अवकाशाच वेगवेगळ्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे.

Leave a Comment