२ सेकंदात आउट ऑफ स्टॉक झाला एमआय ५

xiaomi
मुंबई: भारतात दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त स्मार्टफोन कंपनी शाओमीने आपल्या ग्राहकांसाठी नुकतीच खास ऑफर आणली होती. शाओमीने २० जुलै ते २२ जुलै फ्लॅश सेल केला होता. आपले काही स्मार्टफोन शाओमीने हे अवघ्या एका रुपयात उपलब्ध करुन दिले होते.

२० जुलै ते २२ जुलै दररोज दुपारी 2 वाजता हा याचा फ्लॅश सेल कंपनीच्या वेबसाईटवर सुरु होता. यात शाओमीने एमआय५, रेड्मी नोट ३ Mi Max या स्मार्टफोनसोबतच त्यांची पॉवरबँक आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सही केवळ १ रूपयात उपलब्ध करण्यात आले होते. त्यामुळे या फ्लॅश सेलला फार मोठा प्रतिसाद मिळाला. सेल सुरू होताच फक्त दोन सेकंदात वेबसाईटवरील प्रोडक्ट्स सोल्ड आउट झाली.

२० जुलै ते २२ जुलै तीनही दिवशी २ वाजता हा फ्लॅश सेल ठेवण्यात आला होता. तीनही दिवशी काही सेकंदातच सर्व प्रोडक्ट्स सोल्ड आऊट झाले. कंपनीने एमआय ५ चे १० आणि २०००MAhच्या १०० पॉवरबँक विक्रीसाठी उपलब्ध केल्या होत्या. या सर्व गोष्टी केवळ १ रूपयात कंपनीने दिल्या होत्या. मर्यादित व्हेरिएंट कंपनीने उपलब्ध केल्यामुळे चाहत्यांची निराशाही झाली होती.

Leave a Comment