स्कॉर्पिओचे हायब्रिड व्हर्जन करणार ७ टक्क्यांपर्यंत इंधनाची बचत

scorpio
आपल्या लोकप्रिय स्कॉर्पिओ या गाडीचे हायब्रिड व्हर्जन घरगुती वापरासाठी वाहन बनविण्यासठी प्रसिद्ध असलेल्या महिंद्रा कंपनीने लॉंच केले असून बाजारातही स्कॉर्पियोचे हे नवे व्हर्जन दाखल झाले असून, या मॉडेलची किंमत ९.७४ लाखांपासून ते १४.०१ लाखांपर्यंत असल्याचे नवी मुंबईतील एका शोरूममध्ये सांगण्यात येत आहे.

या मॉडेलमध्ये अगदी बारीक व संशोधक पद्धतीने विचार करून इंजिन देण्यात आल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच, ७ टक्क्यांपर्यंत याचे इंजिन इंधनाची बचत करेल. या इंजिनसाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान हे इंजिनाला इलेक्ट्रीक शक्तिचा वापर करते. तसेच, गाडी एकाच जागी बराच वेळ उभी राहिल्यास इंजिन आपोआपच बंद होते. तसेच, गाडी पुन्हा सुरू होत असताना ब्रेक उर्जेचा वापर करते.

स्कॉर्पिओच्या या नव्या मॉडेलमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासही मदत होणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. कंपनीचे प्रसिडेंट आणि चीफ एग्जिक्यूटीव्ह (ऑचोमटिव) प्रवीण शाह यांनी सांगितले की, महिंद्रा स्कॉर्पियो ‘Intelli-Hybrid’ व्हाईस मेसेजींक सिस्टीमसह उपलब्ध असलेली, , CRDe इंजिनसोबतच ६-स्पीड ऑटोमेटीक ट्रान्समिशन आणि माईल्ड- यायब्रिड सिस्टमवाली पहिली गाडी आहे.

Leave a Comment