शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती देणार हे मोबाईल ॲप

farmers
पुणे – माय विश्‍व टेक्‍नॉलॉजी या कंपनीने शेतीमधील फळे, भाज्या, डाळींची उपलब्धता, किंमत व सद्यःस्थितीविषयी अद्ययावत माहिती देणारे farmersorg.in हे मोबाईल ॲप विकसित केले असून शेतकऱ्यांचा वेळ व खर्चात बचत, मालाला योग्य दर मिळण्याबरोबर मानसिक त्रासही या ॲपमुळे कमी होणार आहे.

पत्रकार परिषदेत माय विश्‍व टेक्‍नॉलॉजीतर्फे या ॲपचे अनावरण करण्यात आले. या वेळी अभिनेते नाना पाटेकर, माय विश्‍वचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, संचालिका सुप्रिया लिमये, गौरी बापट, युवा शेतकरी शेखर डिंबळे आदी उपस्थित होते. जोगळेकर म्हणाले, शेतातून ग्राहकाच्या घरापर्यंत आणण्यासाठी लागणारा खर्च या ॲपमुळे कमी होणार आहे. हा डिजिटल प्लॅटफॉर्म शेतकरी, ग्राहक, घाऊक व किरकोळ विक्रेत्यांना एकत्र आणणार आहे. ग्राहकांना विक्रीयोग्य वस्तूंची यादी या ॲपवर सातत्याने अद्ययावत होत राहणार आहे. शेतकरी व विक्रेत्यांना सोपा अर्ज भरून तो या साइटवर अपलोड केल्यानंतर त्यांना सर्व माहिती उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment