नेक्स्टबिट रॉबिन स्मार्टफोन लाँच

nextbit
नवी दिल्ली : जगातील सर्वात जास्त स्टोरेज क्षमता असणारा १०० जीबी क्लाऊड स्टोरेजवाला नेक्स्टबिटचा रॉबिन हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला असून या स्मार्टफोनची किंमत १९,९९९ रुपये असली तरी ओव्हरकार्ट या वेबसाइटवर फ्लॅशसेलच्या माध्यमातून हा स्मार्टफोन ग्राहकांना १५३९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर क्लॉलकॉम, हेक्सा कोर स्नॅपड्रगन ८०८ चा प्रोसेसर, ३ जीबी रॅम आणि ३२ जीबीची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचबरोबर फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे. याच्या बॅटरीची क्षमता २६८० MAh ऐवढी आहे. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सलचा आहे. हा स्मार्टफोन सिंगल सिम सपोर्ट असून यात मार्शमेलो ६.० ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे.

Leave a Comment