नवी दिल्ली : आपली नवी नेक्स्ट जनरेशनची आर ८ व्ही १० प्लस ही लक्झरी कार नुकतीच जर्मनची लक्झरी कार निर्माता कंपनी ऑडीने लाँच केली आहे. या लक्झरी कारची किंमत २ कोटी २५ लाख रुपये असणार आहे.
ऑडीने आणली आपली नवी लक्झरी कार
या लक्झरी कारचे इंजिन ५.२ एफएसआय क्वाट्रो व्ही १० मिडचे असून ज्याची क्षमता ६१० हॉर्सपॉवरऐवढी आहे. याचा टॉप स्पीड ३३० किमी आहे. ऑडी स्पेस प्रेम असून यामध्ये हाय स्ट्रेंथ ऍल्युमिनियम फ्रेम असल्याने ही कार मोठय़ा अपघातापासून बचाव करु शकते. हँडलिंगबरोबरच लगेच हल्की देखील होते. यात १९ इंचाचे अलॉय व्हिल्स देण्यात आले आहे. त्याचबरोबर ८ एअरबॅग देण्यात आल्या आहेत. यामध्ये टायर प्रेशर कमी झाल्यास याची सूचना वाहनचालनाला मिळते.