इंटेक्सचा रेस्क्यू मोडसह अॅक्वारिंग बजेट स्मार्टफोन लाँच

intex
इंटेक्सने कमी किमतीतला तरीही आकर्षक फिचर्सचा नवा स्मार्टफोन अॅक्वारिंग नावाने बाजारात सादर केला आहे. या फोनचे बॅककव्हर सँडस्टोनचे असून बॅक कॅमेरा व फ्लॅशला रिंगमध्ये बसविले गेले आहे. या फोनची किंमत आहे ४९९९ रूपये व तो अॅमेझॉन इंडियावर ग्राहकांना मिळू शकणार आहे.

या फोनसाठी ड्युल सिम, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, ५ इंची एचडी स्क्रिन ड्रॅगनटेल ग्लास प्रोटेक्शनसह दिला गेला आहे. १ जीबी रॅम, ८ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रोकार्डच्या सहाय्याने ३२ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, ५ एमपीचा बॅक व फ्रंट कॅ मेरा ड्युल एलईडी फ्लॅशसह दिला गेला आहे. त्याचबरोबर ऑटोफोकस, पॅनोरमा मोड, फेस ब्युटी जेस्चर अशी फिचर्सही आहेत. कनेक्टीव्हीटीसाठी थ्रीजी, ब्ल्यूटूथ, वायफाय, जीपीएस, मायक्रो यूएसबी सपोर्ट अशी ऑप्शन्स आहेत. या फोनला इमर्जन्सी रेस्क्यू मोड फिचर दिले गेले आहे. ते अॅक्टीव्हेट करण्यासाठी व्हॉल्यूम की तीन सेकंदापेक्षा अधिक काळ प्रेस करावी लागणार आहे. यामुळे आपला लोकेशनचा मेसेज इर्मजन्सी कॉन्टॅक्ट नंबरवर पाठविला जाणार आहे.

Leave a Comment