अंतराळातून इंटरनेटसाठी फेसबुकच्या अकीलाची झेप

aquila
फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झुकेरबर्गने त्यांच्या महत्वाकांक्षी आकाशातून इंटरनेट सेवा जगभर पुरविण्याच्या योजनेच्या दृष्टीने पहिले यशस्वी पाऊल टाकले आहे. फेसबुकच्या स्वयंचलित व सौर उर्जेवर चालणार्‍या अकीला या ड्रोनने अमेरिकेच्या अरिझोना येथील लष्करी विमानतळावरून अंतराळात यशस्वी उड्डाण केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गेले कांही महिने या चाचण्या सुरू होत्या. अ्किलाने हवेत ९६ मिनिटांपर्यंत उड्डाण केले. बोईंग ७३७ च्या पंखांप्रमाणे आकार असलेल्या या ड्रोनने २८ जूनला पहिले यशस्वी उड्डाण केले मात्र त्याचा व्हिडीओ झुकेरबर्गने २१ जुलैला गुरूवारी शेअर केला.

या ड्रोनसाठी लेझर बीम तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. सध्या ९६ किमीच्या परिसरात ते वेगवान नेटसेवा देऊ शकणार आहे. अकिलाकडून येणारे सिग्नल्स जमिनीवरील टॉवर्स, अॅटेना वायफाय, फोर जी नेटवर्कमध्ये रूपांतरीत केले जावेत अशी ही योजना आहे. ६० हजार फूट उंचीवरून अकिला हे सिग्नल देणार असले तरी त्यापुढे अजून खूप आव्हाने आहेत असेही सांगितले जात आहे. मुख्य प्रश्न आहे तो सौर उर्जेचा. ती पुरेशा प्रमाणात मिळू शकणार असेल तरच ही ड्रोनअधिक काळापर्यंत अंतराळात राहू शकणार आहेत.

Leave a Comment