मॉर्गन प्लस एट- लूक व्हिंटेज, परफॉर्मन्स बेस्ट

morgan
युकेतील मॉर्गन मोटर कंपनीने त्यांची व्हिंटेज लूक असलेली मात्र बेस्ट परफॉर्मन्स देणारी मॉर्गन एट ही कार बाजारात आणली आहे. १९४०-५० या दशकातील कारशी साध्यर्म दाखविणारी ही कार टॉप स्पीड मध्ये आत्ताच्या अनेक कारना मागे टाकणारी आहे. या कारचा टॉप स्पीड आहे ताशी २४९ किमी व ० ते १०० किमीचा वेग घेण्यासाठी तिला लागतात साडेचार सेकंद.

या कारला ४७९९ सीसीचे ४.८ लिटरचे बीएमडब्ल्यू व्ही ८ इंजिन दिले गेले आहे. व्ही एट असे भारी वजनाचे इंजिन असूनही ही कार जगातल्या हलक्या प्रवासी कारमध्ये सामील आहे कारण या कारचे वजन आहे ११०० किलो. या इंजिनाला ६ स्पीड बीएमडब्ल्यू मॅन्युअल गिअरबॉक्स आहे शिवाय ६ स्पीड झेडएफ ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शनही दिला गेला आहे. कारचे इंटिरिअर आकर्षक बनविले गेले असून कारमध्ये हिटरची व्यवस्था, लेदर सीटस आहेत. कारला पॉवर स्टिअरिंग दिले गेले आहे. ही कार लिटरला ८ किमीचे मायलेज देते आणि तिची इंधन टाकीची क्षमता आहे ५०० लिटर.