मेसिला भेटण्यासाठी चाहत्याने समुद्रात पोहून गाठले याट

messie
क्युटा: फुटबॉलचा ‘सुपरहिरो’ लायाणाल मेस्सी याला भेटण्यासाठी त्याच्या चाहत्याने आपल्या जीवाचीही पर्वा न करता समुद्रात उडी ठोकली आणि तब्बल एक किलोमीटर पोहून मेस्सीचे याट गाठले.

मेस्सी इबिजा समुद्र किनाऱ्याजवळ आपल्या याटवर आराम करत असल्याची माहिती त्याच्या एका चाहत्याला मिळाली. सुली नामक या इसमाने समुद्रातून एक किलोमीटर पोहत जाऊन मेस्सीची भेट घेतली. हा अवचित
आलेला ‘बिन बुलाया मेहमान’ पाहून मेस्सीही आश्चर्यचकीत झाला.

मेस्सीने आपल्या या चाहत्याचे आपल्या याटवर स्वागत केले आणि त्याच्यासोबत एक सेल्फीही काढला.

Leave a Comment