मुंबई- गेले कांही दिवस महागाईने होरपळत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. बाजारातील डाळींच्या दरात घरसण सुरू झाली असून येत्या कांही दिवसांत हे भाव सर्वसामान्यांना परवडणारे असतील असे व्यापार्यांचे म्हणणे आहे. यंदाचा समाधानकारक पाऊस आणि डाळपिकांसाठी पोषक हवामान यामुळे यंदा डाळींचे उत्पादन वाढण्याची अपेक्षा केली जात आहे. ऑगस्टपासून नवीन मूगाची आवक बाजारात सुरू होत आहे त्यामुळे साठेबाजांनी त्यांच्या साठ्यातील डाळी विक्रीसाठी बाहेर काढल्याने डाळीचे दर उतरतीकडे चालले आहेत.
डाळींचे दर उतरतीकडे
केंद्राने डाळींचे भाव आटोक्यात ठेवण्यासाठी अनेक योजना राबविल्या होत्या मात्र त्या पुरेशा परिणामकारक ठरल्या नव्हत्या. यंदा पाऊस चांगला झाल्याने देशभरातच डाळींच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. चांगला पाऊस व मध्ये उघडीप असे पोषक वातावरण सध्या आहे. कर्नाटक, महाराष्ट्रातला नवा मूग ऑगस्टपासून बाजारात येत आहे तर उडीदाची आंतरराष्ट्रीीय मागणी घटली आहे तसेच नोव्हेंबरपासून नवीन उडदाची आवक सुरू होत आहे. डिसेंबरपासून नवी तूर बाजारात येत आहे. या सर्वांमुळे साठेबाजांनी त्यांच्याकडील साठे विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. परिणामी डाळीचे दर क्विटलमागे ५०० ते १००० रूपयांनी कमी झाले आहेत.