आसूसचा जगातील पहिला लिक्विड कुलींग लॅपटॉप जीएक्स ७००

asus
आसूसने जगातला पहिला लिक्विड कूल्ड गेमिंग लॅपटॉप जी एक्स ७०० भारतात सादर केला असून या लॅपटॉपचा मागणीनुसारच पुरवठा केला जाणार आहे. या लॅपटॉपची किंमत आहे ४,१२,९९० रूपये. या लॅपटॉपची मागणी फक्त कंपनीच्या वेबसाईटवरूनच नोंदविता येणार आहे.

या लॅपटॉपला १७ इंची फोर के यूएचडी डिस्प्ले दिला गेला आहे. थोडक्यात हा पॉवरफुल डेस्कटॉप पीसी प्रमाणेच आहे फक्त तो मुव्हेबल आहे. त्याला इंटेल कोर आय ७, ६८२० एचके प्रोसेसर दिला गेला आहे. शिवाय ग्राफिक्ससाठी एनव्हीडिया जी सपोर्टही दिला गेला आहे. डिटॅचेबल हायड्रो ओव्हरलॉकिग सिस्टीम कूलींग मॉड्यूल हे याचे खास वैशिष्ठ आहे. याला १६ जीबी डीडीआरए रॅम असून ती ६४ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधाही दिली गेली आहे.

Leave a Comment