स्वदेशी कपडे ब्रँड कंपनी गिरगिटने अनोखी टी शर्ट मालिका बाजारात आणली आहे. हे टीशर्ट घालून घरातून बाहेर सूर्यप्रकाशात गेले की त्यांचा रंग बदलतो व डिझाईनही बदलते.कांही तरी हटके व लक्ष वेधून घेण्याची इच्छा असलेल्या तरूणाईसाठी ही मालिका सादर केली गेल्याचा सांगितले जात आहे.
रंग व डिझाईन बदलणारा टी शर्ट
यात सोलर तंत्रज्ञानाचा वापर केला गेला असून इन्फ्रारेड किरणांच्या सहाय्याने टी शर्टच्या डिझाईनमधील रंग बदलतात असे समजते. म्हणजे घरात असताना पांढरा व थोडेफार काळे डिझाईन असलेला हा टीशर्ट घालून उन्हात गेले तर पांढरा रंग बदलतोच तसेच डिझाईनमध्येही वेगवेगळे रंग आपोआप भरले जातात. अशा प्रकारचे कपडे अमेरिकेत खूपच लोकप्रिय आहेत. आता भारतातही ते उपलब्ध झाले आहेत.