मोबाईल फोन मेकर चायनिज झोपोने त्यांचे उत्पादन केंद्र भारतात या वर्षअखेर सुरू होत असल्याचे जाहीर केले असून त्यासाठी सुरवातीला १०० कोटी रूपयांची गुंतवणूक केली आहे. नॉईडा येथे या केंद्रासाठी जागा घेतली गेली असल्याचे अॅडव्हांटेज कॉम्प्युटर्सचे व्यवस्थापकीय संचालक संजीव भाटिया यांनी सांगितले. अॅडव्हांटेज कॉम्प्युटर्स ही कंपनी झोपोचा भारतातील व्यवसाय पाहते.
चीनी झोपोची भारतात १०० कोटींची गुंतवणूक
भाटिया म्हणाले या उत्पादन केंद्रात दरमहिना २ लाख हँडसेटचे उत्पादन केले जाणार असून त्यातील १ लाख हँडसेट भारतातच विक्री केले जाणार आहेत. बाकी हँडसेट द.आशिया बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी विकले जाणार आहेत. यात बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तान व नेपाळ या देशांचा समावेश आहे.