सिद्धीविनायक मंदिरात देता येणार शेअर्सचे दान

vinayak
मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टने एसबीआय कॅपिटलबरोबर नुकत्याच केलेल्या करारानुसार यापुढे भाविकांना गणेशाला शेअर रूपातही दान देता येणार आहे. एसबीआयच्या कॅपिटल मार्केट लिमीटेड कंपनीत या ट्रस्टचे अकौंट एसबीआय कॅप सिक्युरिटीजच्या माध्यमातून उघडले गेले आहे. नव्या रूपातील ई डोनेशन प्लॅटफॉर्म मधून डिमॅटच्या सहाय्याने भक्त शेअर रूपी दान ऑनलाईनही ट्रान्स्फर करू शकणार आहेत. हे दान शेअर्स ट्रस्टच्या सेव्हींग अकौंटमध्ये जमा केले जाणार आहे.

ट्रस्ट त्यांच्या गरजेनुसार हे शेअर्स विकून समाजसेवा, मंदिर खर्चासाठी तो पैसा वापरू शकणार आहे. सध्या फक्त लिस्टेड कंपन्यांचेच शेअर्स दान स्वरूपात स्विकारले जाणार असले तरी लवकरच म्युच्युअल फंड, बॉन्डस, गोल्ड बॉन्डस् ही या स्वरूपात स्विकारले जातील असेही समजते. सिद्धीविनायक मंदिराला दर वर्षी सरासरी ५० कोटी रूपये दानातून येतात तर ट्रस्टच्या १२५ कोटी रूपयांच्या ठेवीही आहेत. यापूर्वी तिरूपती बालाजी ट्रस्टनेही डिमॅट खाते खोलून शेअर दान करण्याची सुविधा भाविकांना दिली आहे.

Leave a Comment