माल्ल्या सारख्या आणखी धनदांडग्यांनी बुडवले बँकांचे ५८,७९२ कोटी रुपये

aibea
चेन्नई- भारतीय स्टेट बँक आणि इतर सहकारी बँकांचे ९,००० कोटी रुपये बुडवून उद्योगपती विजय माल्ल्या फरार झाले. पण आपल्या देशात हजारो कोटींची कर्जे बुडविणारे माल्ल्या हे एकटेच नाही तर त्यांच्या सारख्याच इतर धनदांडग्यांनी भारतीय बँकांचे तब्बल ५८,७९२ कोटी रुपये बुडवले असल्याचे भारतीय बॅंक कर्मचारी संघाने किंवा एआयबीईएने म्हटले आहे. सरकारी बॅंकांना बुडीत कर्जांचा सर्वाधिक फटका बसला आहे. सरकारी बॅंकांची ४७,३५१ कोटी रुपये किंमतीची कर्जे बुडाली आहेत. कर्ज बुडव्या धनदांडग्यांवर जशी कारवाई व्हायला पाहिजे तशी होत नसल्याचे त्यांनी एआयबीईएने म्हटले आहे.

Leave a Comment