एलजीचा ड्युअल डिस्प्ले एक्स स्क्रीन स्मार्टफोन लाँच

xscreen
एलजी इंडियाने त्यांचा नवा स्मार्टफोन एक्स स्क्रीन भारतात लाँच केला आहे. या फोनसाठी ड्युअल डिस्प्ले स्क्रीन दिला गेला आहे व हा स्क्रीन नेहमी ऑन राहणार आहे. यापूर्वीही एलजीने त्यांच्या जी ५ व व्ही१० साठी ड्युअल डिस्प्ले दिले आहेत मात्र हे फोन महाग आहेत तर एक्स स्क्रीन ही सुविधा असलेला बजेट स्मार्टफोन आहे. बुधवार पासून हा फोन फक्त स्नॅपडीलवर १२९९० रूपयांत मिळू शकणार आहे. काळा व पांढरा अशा दोन रंगात तो मिळणार आहे.

या फोनासाठी अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, ४.९ इंचाचा प्रायमरी व १.७६ इंचाचा दुसरा डिस्प्ले दिला गेला आहे. दुसरा डिस्प्ले अॅप्ससाठीची नोटिफिकेशन दाखवेल. त्यामुळे मल्टीटास्कींग करताना नोटिफिकेशन, टाईम, बॅटरी स्टेटस, डेटस चेक करता येणार आहेत. हा एसओएस मोडचा पहिलाच फोन असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. सेकंडरी डिस्प्लेला एसओएस बटण असून पॅनिक बटण ऑपरेट करण्यासाठी पॉवर बटण पाच वेळा दाबावे लागणार आहे. या फोनसाठी २ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी, १३ एमपीचा रिअर तर ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा अशी फिचर्स आहेत. कनेक्टिव्हीटीसाठी फोरजी, थ्रीजी, एलटीई, ब्ल्यू टूथ, जीपीएस, वायफाय अशी ऑप्शन्स आहेत.

Leave a Comment