रोहित खंडेलवाल ‘मिस्टर वर्ल्ड २०१६’

rohit-khandelwal
हैदराबादच्या रोहित खंडेलवालने अनेक टप्पे पार करत मि. वर्ल्ड २०१६ चा किताब पटकावला असून रोहितच्या रुपाने त्यामुळे भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. रोहितला नामांकित अशा ‘मिस्टर वर्ल्ड २०१६’च्या किताबाने साउथपोर्ट थिएटर येथे एका भव्य समारंभात सन्मानित करण्यात आले. जगभरातून सहभागी झालेल्या ४७ स्पर्धकांना मात देते रोहितने हा किताब पटकाविला आहे. या किताबासह रोहितला ५० हजार डॉलर इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.रोहितला गेल्या वर्षी प्रोवोग पर्सनल केयर मिस्टर इंडिया २०१५चा किताबही मिळाला होता.