पश्चिम युरोपिय देशातील नेदरलँडसच्या अॅमस्टरडॅम येथील रस्त्यांवरून मर्सिडीजच्या फ्यूचर बसने २० किमीचा यशस्वी प्रवास केला असून तिच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. या बसने बोगद्यातून जाताना स्वतः ब्रेक लावले, तसेच वाहतूक नियमांचेही पालन केले. ही बस स्वयंचलित आहे. सिटी पायलट नावाच्या टेक्नॉलॉजीचा वापर यात केला केला आहे. सार्वजनिक वाहतुकीचे भविष्य म्हणून या बस कडे पाहिले जात आहे.
मर्सिडीजच्या फ्यूचर बसच्या चाचण्या यशस्वी
या बससाठी ७.७ लिटरचे इंजिन दिले गेले असून बाहेरच्या दृष्यांचा प्रवाशांना पुरेपूर आनंद मिळेल या पद्धतीनेच तिचे इंटिरियर केले गेले आहे. या बससाठी डिझायनर सीटस आहेतच पण बसवरील नियंत्रणासाठी कॅमेरे, रडार व कनेक्टेड डेटा अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. बसला स्वयंचलित दरवाजे आहेत. सार्वजनिक वाहतुकीत या बसेस कधी दाखल होणार याची प्रतीक्षा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.